आजरा दि ६ : आजरा महाविद्यालयातील इयत्ता अकरावी कला या वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रो. किरण पोतदार , उपप्राचार्य दिलीप संकपाळ व कार्यालयीन अधीक्षक श्री योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप संकपाळ सर यांनी मनोगत व्यक्त करताना 'महाविद्यालयामध्ये पाऊल टाकत असताना शिक्षणाची आबाळ होऊ नये यासाठी शैक्षणिक साहित्य तुम्हाला उपलब्ध करून दिले आहे. त्याचा चांगला वापर करून तुम्ही तुमचे जीवन उज्वल करावे. तुमचे करिअर घडवण्यासाठी महाविद्यालय नेहमीच तुमच्या पाठीशी असेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानाची आस बाळगून भरपूर शिकावे,असे मत व्यक्त केले.'
याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. विनायक चव्हाण, प्रा सौ. शोभा फड, प्रा. एम आर शिंत्रे, प्रा.व्ही. डी.हाके, प्रा.डॉ.रणजीत भादवणकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अनिल निर्मळे यांनी केले तर आभार प्रा. रत्नदीप पवार यांनी मानले.