राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ स्वतःसाठी जगण्याची नव्हे, तर समाजासाठी जगण्याची प्रेरणा देणारी चळवळ आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रउभारणीत सक्रिय योगदान दिले पाहिजे’, असे प्रतिपादन प्रा. विनायक चव्हाण यांनी केले. आजरा महाविद्यालय, आजरा येथे राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे औचित्य साधून ‘राष्ट्र उभारणीत NSS चे योगदान’ या विषयावर व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे