विद्या मंदिर पारेवाडी शाळेत विद्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणिक साहित्यांचे वाटप

विद्या मंदिर पारेवाडी शाळेत विद्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणिक साहित्यांचे वाटप

 विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी व शिक्षण सुखकर व्हावे या दृष्टिकोनातून Connect For Organization & Pagariya Welfare Foundation, Mumbai  या संस्थेमार्फत व आजरा महाविद्यालय आजरामधील  राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ‘विद्या मंदिर पारेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर’ या शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये रेनकोट, वह्या, परीक्षेसाठी आवश्यक पॅड व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

            यावेळी आजरा महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील एनएसएस प्रकल्प अधिकारी  डॉ. अविनाश वर्धन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक साहित्याचा वापर आपल्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करावा तसेच विद्यार्थ्यांनी नवीन शिक्षण आत्मसात करून आपली प्रगती करावी. विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आवड सहज मनामध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक साहित्यची गरज भासत आहे. ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक प्रवाहातील नवे साहित्य उपलब्ध होत नाही.  अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे कार्य  Connect For Organization & Pagariya Welfare  Foundation, Mumbai या सारख्या सामाजिक संस्था करत आहेत. त्याबद्दल या दोन्ही संस्थांचे आभार त्यांनी मानले.  

            या कार्यक्रमास आजरा महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा, रत्नदीप पवार तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा. अनिल निर्मळे, पारेवाडी गावचे पोलीस पाटील श्री. महेश माने तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनायक राजयोगी, सहाय्यक शिक्षिका यादव मॅडम याबरोबरच पालक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक विनायक राजयोगी यांनी मांडले.